लादेनचे नातेवाईक विमान अपघातात ठार

लादेनचे नातेवाईक विमान अपघातात ठार

दक्षिण इंग्लंड प्रांतात झालेल्या विमान अपघातात, ओसामा बिन लादेनच्या कुटुंबियांतील काही जणांचा मृत्यू झाला आहे.  इंग्लंडच्या सौदी अरब दुतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इटलीच्या मिलान शहरातून येणारं विमान लँडिंगवेळी कोसळल्याने हा अपघात झाला. यामध्ये वैमानिकासह चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये लादेनच्या तीन नातेवाईकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, लादेनच्या नातेवाईकांची नावे स्पष्ट होऊ शकली नाहीत.

ब्रिटनमधील सौदी अरेबियाचे राजदूत प्रिन्स मोहम्मद बिन नवाफ अल सौद यांनी ट्विटरवरून लादेनच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *