औषध विक्री दुकानासाठी बनावट परवाना, टोळीतील सहा जणांना अटक

औषध विक्रीच्या दुकानासाठी बनावट परवाना देणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारावाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नरेंद्र गेहलोत, हरिशंकर जोशी, दीपक विश्वकर्मा, प्रेमचंद चौधरी, प्रवीण गड्डा आणि महेंद्र भानूशाली अशी अरोपींची नावे आहेत. या सहा आरोपींना २६ फेब्रुवारीपर्य़ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस याबाब अधिक तपास करत आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या कित्येक दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे, मुंलुंड, भिवंडी या शहरात औषध विक्रीचा व्यवसाय करत होते.  या कारवाईत वैद्यकीय प्रमाणपत्रांसह दहावी-बारवीचे बनावट प्रमाणपत्र देखील आढळले असून, ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *