अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बिग बॉसची विजेती शिल्पा शिंदे हिने काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्या पाठोपाठ आता आसावरी जोशी यांनीदेखील काँग्रेसला पसंती दिली आहे.

अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमुळे आसावरी जोशी हा चेहरा घराघरात पोहोचला. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होणार हे मात्र नक्की आहे. या दोघींनाही काँग्रेसकडून तिकीटं मिळते की स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *