तजिकिस्तानात भूकंप ,दिल्लीपर्यंत हादरे…

मध्य आशियातील ताजिकिस्तान  या देशात जोरदार भूकंप झाला असून या भूकंपाचे हादरे पाकिस्तानपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी जाणवल्याचे समजते. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केलची असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे.

माहितीनुसार ताजिकिस्तानातील दक्षिण कोफ्रानिहोन परिसरात आज सकाळी आठच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाचे तीव्र धक्के येथील अनेक इमारतींना जाणवले. या भूकंपानंतर काही वेळातच पाकिस्तानातील काही शहरांना भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले आणि शहराच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *