बारावीची उद्यापासून परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्या, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

 या परीक्षेचे वेळापत्रक २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. ते बोर्डाच्या वेबसाइटवर आहे. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. नऊ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. राज्यात २ हजार ९५७ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. यंदा विशेष बाब म्हणून मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्काला लिहिता येत नाही, त्यामुळे तिला नियमानुसार तशी परवानगी देण्यात आली आहे, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *