प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे निधन

प्रसिद्धहिंदी लेखक नामवर सिंह यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. ते ९३ वर्षाचे होते. मंगलवारी रात्री ११:५० वाजता एम्स रुग्णालयात नामवार सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नामवर सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात दुपारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. जानेवारी महिन्यात नामवर सिंह यांना चक्कर आल्यामुळे ते पडले होते. त्यावेळी त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. नामवार सिंह यांना गेल्या काही दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा आजार होता. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती.

नामवर सिंह यांचा जन्म २८ जुलै १९२७ रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९५९ मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

छायावाद(1955), इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविताचे नविन प्रतिमान(1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद आणि संवाद(1989) यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *