फलटणमध्ये पाच कोटींच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

फलटण (जि. सातारा) येथील एका प्रख्यात डॉ. संजय राऊत यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना अज्ञातांनी अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांनी नंतर रूग्णालयात फोन करून याची माहिती देत पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

फलटण येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संजय राऊत हे मंगळवारी (दि.१९) रात्री १० वाजता आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी मोटारीतून आलेल्या काहीजणांनी डॉ. राऊत यांचे अपहरण केले. त्यानंतर ११ च्या सुमारास राऊत यांच्या सिद्धनाथ रूग्णालयात डॉक्टरांच्या मोबाईलवरून फोन करून रूग्णालयाच्या व्यवस्थापकांना डॉक्टरांचे आम्ही अपहरण केले असून, पाच कोटी रुपये खंडणीची मागणी केली.

या घटनेची माहिती समजताच फलटण विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ अभिजित पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी डॉ. राऊत यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *