काश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या

भारतीय लष्करात असणऱ्या पतीने जम्मू काश्मीरमध्ये जाऊ नये या हट्टापयी पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात शनिवारी हा प्रकार घडला. मीनाक्षी जेठवा (२२) असे या महिलेचे नाव आहे. मीनाक्षी या योगेश्वर नगरातील राहत्या घरात लष्करात जवान असलेले तिचे पती भूपेंद्रसिंह जेठवा यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.

खंभालिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूपेंद्रसिंह यांची पोस्टींग झाली. ते नुकतेच सुटीवर घरी आले होते. भूपेंद्रसिंह हे जम्मू-काश्मीरमधील हिमवर्षावाशी सामना करून घरी परतले होते. पुलवामा येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मनात भिती असलेल्या मीनाक्षी यांनी पतीला लष्करात न जाण्याची विनंती केली होती. मात्र, पती आपल्या निर्णयावर ठाम होते. परिणामी मीनाक्षीने आपले जिवन संपले.

भूपेद्रसिंह आणि मीनाक्षी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपल्या पतीने पुन्हा लष्करात जाऊ नये अशी मीनाक्षी यांची इच्छा होती. भूपेंद्रसिंह यांना तशी वेळोवेळी विनंती केली होती. मात्र, सुटी संपल्यानंतर आता आपल्याला ड्युटीवर जावेच लागेल असे भूपेंद्रसिंह यांनी मीनाक्षी यांना सांगितले. त्यातच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मीनाक्षी यांना भीतीने ग्रासले होते, अशी माहिती महिला पोलीस अधिकारी के. एन. जडेजा यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *