घरात घुसून तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला ७ वर्षे तुरुंगवास

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणाºयाला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.
गुलाब लालमा पठाण (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १० आॅक्टोबर २०१४ रोजी कोंढवा परिसरात घडली होती.
घटनेच्या दिवशी पीडितेची आई सोलापूरला गेली होती. तर, भाऊ कामाला गेले होते. त्यामुळे पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याचा फायदा घेत पठाण दुपारी दोनच्या सुमारास तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री १० वाजता पीडिता गरोदर राहू नये, यासाठी तिला गोळी देण्यासाठी गेला होता.
याबाबत तिने घराच्या मालकिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून रात्री ११ वाजता पीडितेच्या दोन्ही भावांना हा प्रकार समजला. दोघे भाऊ पठाण याला जाब विचारण्यास गेले. त्या वेळी त्यांच्यात भांडण झाले.
तिच्या भावांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तर पठाण याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अंजूम कासम बागवान यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार संतोष अंगणे आणि पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.
दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावेत.

दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम
पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेचा जबाब आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *