पती-पत्नीमधील भांडणे पोलिसांना नवी नाहीत. अशी अनेक भांडणे पोलिसांनी सोडविलेली आहेत. एरंडवणा परिसरातील नवरा-बायकोच्या भांडणात पोलिसांना मार खावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एक महिला अलंकार पोलिस चौकीत आली. त्या वेळीपती-पत्नीमधील भांडणे पोलिसांना नवी नाहीत. अशी अनेक भांडणे पोलिसांनी सोडविलेली आहेत. एरंडवणा परिसरातील नवरा-बायकोच्या भांडणात पोलिसांना मार खावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एक महिला अलंकार पोलिस चौकीत आली. त्या वेळी रागाच्या भरात तिच्या पतीने पोलिसालाच मारहाण करून कुलूप फेकून मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी त्या व्यक्तीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.
स्वानंद मल्हारी धनवे (वय ३३, रा. संजय गांधी वसाहत, एरंडवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई एस. एच. चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वानंद धनवे आणि त्याच्या पत्नीचे मंगळवारी दुपारी भांडण झाले. त्याने पत्नीला मारहाण केल्याने तिने थेट अलंकार पोलिस चौकीत येऊन तक्रार केली. समज देण्यासाठी म्हणून पोलिसांनी चौकीमध्ये तिच्या पतीला बोलविले होते. परंतु, स्वानंद याने चौकीत आरडाओरडा सुरू करत ‘मी काय गुन्हेगार आहे का मला चौकीत बोलवायला,’ असा पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी त्याला शांत होण्यास सांगितले. पण, तो चव्हाण यांच्या अंगावर धावून गेला. चौकीमध्ये खिडकीमध्ये ठेवलेले स्टीलचे कुलूप फेकून चव्हाण यांना मारले. स्वानंद जास्तच आक्रमक झाल्याने इतर पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पी. जी. शिनगारे करत आहेत.