दुष्काळग्रस्तांसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईसाठी हा हप्ता वितरित करण्यात आला. मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा मदतनिधी तातडीने जमा करण्याचा आदेश दिला आहे. मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दुष्काळग्रस्त भागांसाठी मदत जाहीर करण्यात आली असून मदतनिधी वाटप सुरु करण्यात आला आहे. यासाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. हा निधी विभागीय आयुक्तांच्या मार्फेत जिल्हाधिकारी आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना वर्ग केला जाणार आहे. यानंतर हा निधी दुष्काळग्रस्त भागातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली जात असून काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. मुख्य सचिवांनी यादया लवकरात लवकर तयार करुन निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे.
