धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

चोरट्याचा पाठलाग करताना प्राजक्ता गुप्ते या युवतीचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मूत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या प्रकरणात लोकलच्या मोटरमनलाही मेमो देण्यात आलाय. संतापदायक म्हणजे, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी डोंबिवली जीआरपीनं तब्बल २४ तासांचा वेळ घेतला.

कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान पत्रीपुलानजिक ही धक्कादायक घडली आहे. कल्याण येथील रहिवासी असलेली प्राजक्ता नवी मुंबईत महापे येथे एका आयटी कंपनीत कामाला होती.

कल्याणला जात असताना लोकलच्या दारात प्राजक्ता उभी  होती. रात्री साडे आठच्या सुमारास एका चोरट्याने तिच्या हातातील बँगवर झड़प घालत बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच प्राजक्तानं ट्रेनमधून उडी मारत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याच दरम्यान कल्याणवरून सीएसटीकडे जाणाऱ्या एका लोकलने प्राजक्ताला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *