अॅपलचा iPhone SE सेल सुरू

मॅकरुमर्सच्या माहितीनुसार, आयफोन से वर मोठी सूट देण्यात येत आहे. ३२ जीबीचा मोबाइल १७ हजार ८०० रुपयांना मिळत आहे. या आधी या मोबाइलची किंमत २१ हजार ३०० रुपये इतकी होती. म्हणजेच या मोबाइलवर ३ हजार ५०० रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा फोन ग्रे, रोज गोल्ड, गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. आयफोनसे मार्च २०१६ मध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन होता. भारतात सध्या हा फोन १६ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.

आयफोन से मार्च २०१६ मध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन आहे. आयफोन से ला ४ इंचाचा डिस्प्ले असून २ जीबी रॅम आहे. स्टोरेजसाठी ३२ जीबी आणि १२८ जीबी हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि १.२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच १.६२४ क्षमतेची बॅटरी आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *