वेश्या व्यवसाय करणार्‍या उच्च शिक्षित महिलांवर पोलिसांची संक्रात

पुण्यातील बुधवार पेठमधील काही भागामध्ये वेश्या व्यवसाय चालतो. या परिसरात शहरातील अनेक भागातील उच्च शिक्षित महिला देखील आढळून आल्या आहेत. अशा महिलांवर पंधरा दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती फरासखाना पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक  के. एन. नावंदे यांनी दिली.

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अल्पवयीन तरुणी किंवा बांगलादेशी तरुणीना बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते का? या पार्श्वभूमीवर परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाकडून आज या परिसरात कोबिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी जवळपास 100 हून अधिक महिलांकडे कसून चौकशी करण्यात आली. तर या दरम्यान परिसरात भटकणार्‍या तरुणांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले.

यावेळी फरासखाना पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक के. एन. नावंदे म्हणाले की, बुधवार पेठ भागात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला आणि तरुणीची संख्या 1500 हून अधिक आहे. त्या बाबत आमच्याकडे नोंदी देखील आहेत. दर काही महिन्यानी अल्पवयीन तसेच बांगलादेशी तरुणींना बळजबरीने हा व्यवसाय करण्यास भाग पाडले. तर जात नाही? याचा शोध घेतला जातो. जर अशा तरुणी किंवा महिला आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *