जोगेश्वरीत उड्डाणपुलावरुन कार कोसळून चालक जखमी

मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक मार्गावरील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. उड्डाणपुलावरून होंडा सिटी कार खाली पडून चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुकुंद भंडारे असं जखमी चालकाचं नाव आहे. चालक अंधेरीहून पवईच्या दिशेनं अत्यंत वेगात गाडी चालवत असल्याचं स्थानिकांनी सांगितले. सुदैवानं उड्डाणपुलाखाली कुणी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी जखमी चालकाला गाडीबाहेर काढले आणि राजावाडी रुग्णालयात भरती केले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

प्रकृती स्थिर 

जोगेश्वरी विक्रोळी लिंक मार्गावर दिशेने एक भरधाव वेगाने होंडा सिटी कार येत होती. उड्डाणपुलावर गेल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याचे स्थानिकांनी  सांगितले. त्यावेळेस जास्त रहदारी नसल्याने चालका व्यतिरिक्त कोणाला इजा झाली नाही. आम्ही चालकाला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *