महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे करणारे अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी प्रत्येक माणसाच्या घरात मन केलं आहे. झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून शंभू राजे प्रत्येकापर्यंत पोहोचवले.
डॉ अमोल कोल्हे यांनी शंभू राजे यांची कारकिर्द आणि त्याकाळचा इतिहास अगदी जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा केला आहे. एक महत्वाची मालिका म्हणून या मालिकेकडे सगळे प्रेक्षक पाहत आहेत.
या मालिकेत शंभू राजांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अपार कष्ट घेतले आहे. ‘स्पार्टन’सारख्या लढाईवर एवढा भलामोठा सिनेमा होऊ शकतो. मग आपल्या राजाच्या एवढ्या दैदिप्यमान कार्याची माहिती लोकांना झालीच पाहिजे. हा महत्वाचा उद्देश असणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांना 2019 चा ‘मराठी विश्वभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
