बेस्ट संपाने बसेस आगारातच, वाहतूक ठप्प

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने जवळपास ३० हजार कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. मुंबईत सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नसून सातच्या ड्युटीवर केवळ १ कंडक्टर आणि ८ चालकांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टच्या संपामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्ट प्रशासनाकडून याआधीच संपात सहभागी झालेल्यांविरोधात ‘मेस्मा’ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *