१० वर्षांपासून कोमात असणाऱ्या महिलेने दिला बाळाला जन्म

अमेरिकेतील सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० वर्षापासून कोमात असणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. या घटनेमुळे सर्वजण चकित झाले आहेत. पोलीस आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना दहा वर्षांपासून कोमात असणारी महिला गर्भवती कशी झाली? असा प्रश्न पडला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात अली असून पुढील तपास सुरु आहे.

अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील हॅसिएंडा हेल्थ केअरमध्ये ही घटना घडली आहे. तेथील स्टाफने या महिलेवर बलात्कार केला असावा अशी शक्यता देखील याठिकाणी वर्तवन्यात आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या महिलेसाठी आवाज उठवला असून. टाशा मेनेकर नावाच्या एका महिला वकिलांनी रुग्णालयातल्या सर्व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षापूर्वी या पीडित महिलेचा अपघात झाला होता. अपघातानंतर ब्रेन हॅमरेज होऊन ती कोमात गेलेली. तेव्हापासून ती रूग्णालयात आहे. तिथे तिच्यावर पूर्णवेळ उपचार सुरू आहेत. २९ डिसेंबरच्या रात्री अचानक रुग्णालयातील नर्सला त्या महिलेच्या पोटाजवळ काही हालचाल दिसून आली. तसेच ती महिला हलक्या आवाजात कण्हत देखील होती. त्यानंतर नर्सने तिला तपासले असता तिला प्रसूती कळा सुरू झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी सर्वप्रथम ती महिला गरोदर असल्याचे नर्स व डॉक्टरांना समजले. त्यानंतर काही वेळातच त्या महिलेने मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्या महिलेच्या हालचाली पुन्हा बंद झाल्या. १० वर्षापासून कोमात असणाऱ्या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. दररोजच्या तपासणी दरम्यान तिच्यावर लैगिंग अत्याचार झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामुळे रुग्णालयातले अन्य रुग्णांचे नातेवाईकही चिंतेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *