खेळ जीवावर बेतला, लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू

वसई येथे खेळ जिवावर बेतल्याची घटना घडली. तीन मुले लिफ्टमध्ये खेळत होती. यावेळी लिफ्ट सुरु झाली. त्यावेळी दोन मुले लिफ्टबाहेर पडली. मात्र, एका सात वर्षांचा मुलाचा पाय लिफ्टच्या फटीत अडकला. त्याचवेळी लिफ्ट सुरु झाली आणि तो दारात अडकला. तो लिफ्टसोबत खाली गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

वसई पूर्वेच्या सातीवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीमध्ये आज सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. हंसकुमार संदीप गौड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत होता. सकाळी तीन मुले लिफ्टमध्ये खेळत असताना, हंसकुमार या मुलाचा पाय लिफ्ट आणि दाराच्या गॅपमध्ये अडकला. मात्र, त्याआधी दोन मुले बाहेर पडली. मात्र, खेळण्याच्या नादात त्यांनाही काहीही समजले नाही. ज्यावेळी लिफ्ट खाली गेली त्यावेळी अडकलेला मुलगा लिफ्ट सोबत खाली गेला आणि त्यात अडकून त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *