कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली.
रुळाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. पण कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे आणि लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
