धावत्या रिक्षेत 42 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

दिल्लीत राहणाऱ्या 42 वर्षांच्या महिलेवर रिक्षाचालकाने साथीदारांच्या मदतीने धावत्या रिक्षेत सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुग्राम येथे घडली आहे. महिलेवर एका खोलीतही बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच रिक्षाचालकांना अटक केली आहे.

दिल्लीत राहणाऱ्या महिलेच्या पतीचे 2013 साली निधन झाले असून तिचा पती कंत्राटदार होता. गुरुग्राम येथील आयएमटी मानेसरमधील एका कंपनीशी महिलेचा आर्थिक वाद होता. संबंधित कंपनीने पतीच्या निधनानंतर पैसे थकवले होते आणि यासंदर्भातच महिला शनिवारी गुरुग्रामध्ये आली होती. शनिवारी दुपारी महिलेने नाखरोला चौक येथून आयएमटी मानेसर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा अंकित चालवत होता तर दीपक हा आधीपासूनच रिक्षेत बसला होता. मात्र, त्या दोघांनी आयएमटी मानेसर येथे रिक्षा न नेता दीपकच्या घराच्या दिशेने नेली. दीपकच्या घराबाहेर आधीपासूनच एक व्यक्ती थांबला होता. या तिघांनी महिलेला खेचत दीपकच्या घरात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी महिलेला रामपुरा मोड येथे आणखी दोन रिक्षा चालकांकडे सोपवले. त्या दोघांनी मित्राला बोलावून घेतले. त्यांचा मित्र एक तास रिक्षा फिरवत होता आणि ते दोघे मागच्या सीटवर धावत्या रिक्षेत महिलेवर बलात्कार करत होते. रिक्षा चालवणाऱ्या तरुणानेही महिलेशी असभ्य वर्तन केले. शेवटी रात्री उशिरा त्यांनी महिलेला रामपुरा फ्लायओव्हर खाली सोडून दिले. महिला  बेशुद्धावस्थेत होती. तिच्याकडील मोबाईलही हरवला होता. रविवारी सकाळी एका नागरिकाने तिला पाहिले आणि या घटनेची पोलिसांना देण्यात आली.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्रे फिरवली आणि अंकित, दीपक, महिपाल, अजित, सुन्नू या पाच जणांना अटक केली. सर्व नराधम हे रिक्षाचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *