इंडिगोच्या विमानात सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला अटक

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात प्रवासादरम्यान एक प्रवासी सिगारेट ओढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ डिसेंबरला इंडिगोचे ६ई-९४७ हे विमान अहमदाबादहून गोव्याला जात होते. त्यावेळी एक प्रवासी विमानातील स्वच्छतागृहात सिगारेट ओढताना आढळून आला. यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी या प्रवाशाला सिगारेट विझवायला सांगितली.

मात्र, या प्रकारामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याने विमान गोवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले.

गेल्याच आठवड्यात विस्तारा एअरलाईन्सच्या विमानातही असाच प्रकार घडला होता. यावेळी सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाने कर्मचाऱ्यांशी बराच वेळ वाद घातला. मला सिगारेट ओढायची इच्छा झाली, असे सांगत त्याने बरीच हुज्जत घातली होती. त्यामुळे हे विमान सुटायला तब्बल तीन तास उशीर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *