१० वर्षांच्या मुलाची हत्या, एका अल्पवयीन मुलाला अटक

साकीनाक्यात दहा वर्षीय शाकिर चौधरी या मुलाच्या हत्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाकिरचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. या मुलाने शाकीरची हत्या केल्याची कबुली दिलीय.

दोन दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी साकीनाका परिसरात तो बेपत्ता झाल्याची तक्रारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान शाकीरचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून ती ९०फूट रोडजवळील नाल्यात टाकल्याचे सांगितले आहे. या नाल्यात ही बॅग सापडली आहे.

साकीनाका भागातील दहा वर्षांचा मुलगा २० डिसेंबरला शिकवणीला गेला होता. तो घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता सापडला नाही. त्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून तपासावरुन या प्रकरणाचा छडा लावला.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या मुलाने हत्येची कबुली दिली आहे. त्यानंतर मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला असता तो सापडला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मुलाचा खून कसा करण्यात आला, याची माहिती हाती मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाने त्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याने एक तास या मुलाच्या वडिलांसोबतही घालविल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *