मृत मित्राच्या मुलीला पाठवला पॉर्न व्हिडिओ

वडिलांचे निधन झाल्यानंतर सांत्वन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या एका मित्रानं १९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ  पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीनं वांद्रे पोलीस ठाण्यात जावून याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

वांद्रे येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीच्या वडिलांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. वडिलांचा मित्र आहे, असं सांगून लालचंद (वय ४०) या व्यक्तीनं तरुणीचा मोबाइल नंबर मिळवला. त्यानंतर लालचंद यानं तिच्या घरी येणे-जाणे वाढवले. तसेच तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. तिला दररोज फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. १४ डिसेंबर रोजी लालचंदने तरुणीच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवला. या प्रकाराने तरुणी चांगलीच हादरली. तिनं सरळ पोलीस स्टेशनमध्ये जावून लालचंदविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून लालचंदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अनावस्कर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *