स्कूल व्हॅनला अपघात

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कूल व्हॅनची कचराकुंडीला धडक बसून गुरुवारी सकाळी डांगे चौक येथे अपघात झाला. या वेळी व्हॅनमध्ये सात विद्यार्थी होते. यापैकी कोणीही जखमी झाले नाही.

दरम्यान, व्हॅनचालकावर पिंपरी-चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटणी येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतील मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला हा अपघात झाला. व्हॅनची धडक बसल्याने कचराकुंडी काही अंतर पुढे ढकलली गेली. तसेच, गाडीचे यामध्ये नुकसानही झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *