म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना धमकी

म्हाडाचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेत असल्यामुळे विकासक आणि समाजकंटकांकडून माझ्या जिवाला धोका असल्याचं पत्र म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पोलिसांना दिलंय. उदय सामंत हे शिवसेनेचे आमदार आहेत.

म्हाडाचे अध्यक्ष झाल्यापासून आपल्याला धमक्या येत असल्याचे उदय सामंत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर त्यांनी संबंधितांना सुरक्षाव्यवस्था पुरवणयाचे आदेश दिलेत मात्र तरी देखील सुरक्षा पुरवण्यात आली नाही, त्यामुळे उद्या मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

सुरक्षा देण्याबाबत सांगूनही सुरक्षा न दिल्याने सामंत नाराज आहेत. गृह विभागालाही पत्र लिहिले असून आपल्या जीवाचं बरं वाईट काही झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे देखील उदय सामंत यांनी पत्रात नमुद केले आहे. आपल्याला तातडीनं संरक्षण मिळावे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *