बीडमध्ये ‘सैराट’ थरार, बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याने मेव्हण्याची हत्या

बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्याची मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे.

बीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळेसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता.

आपल्या बहिणीचे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून त्याने अनेकदा गोंधळही घातला होता. बुधवारी सुमीत आपल्या पत्नीसह महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा देऊन सुमीत बाहेर पडल्यानंतर संकेत याने आपल्या मित्रांसह सुमीतवर चाकूने हल्ला केला. चार ते पाच वार करून हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *