राज्यात थंडीचा पहिला बळी

राज्यात पाऱ्याची घसरण सातत्याने सुरू आहे. थंडीचा पहिला बळी लातूरमध्ये गेलाय. लातूरमध्ये सध्या ११ ते १२ अंश सेल्सिअस तापमान आहे. लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात थंडीमुळे एकाचा मृत्यू झालाय. वैभव पोतदार असं या व्यक्तीचं नाव आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी इथले हे रहिवासी आहेत. पोतदार रात्रीपासून बसस्थानक परिसरात होते. सकाळी स्थानकातल्या सफाई कर्मचारी सुरेखा बनसोडे यांना पोतदार थंडीत कुडकुडत असलेले दिसले. त्यांना बनसोडे यांनी चादरही दिली. पण थोड्याच वेळात पोतदार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *