मुंबई- पुण्यात पुढील काही तास मुसळधार; मान्सूनचा वेगवान प्रवास सुरू

सोमवारपासून सुरू झालेल्या पावसानं मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्येसुद्धा राज्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे शहराला आजही पावसाचा यलो अलर्ट

मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्येसुद्धा पावसानं हजेरी लावली असून, पुण्यातही असंच चित्र पाहायला मिळेल. तर, जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज धरणसाखळी क्षेत्रात देखील आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या, त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिली आणि शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले
तर आता पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असतील.

मुंबईला यलो अलर्ट 

मुंबईतसुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसत असून, अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असला तरीही सूर्यनारायणाचं दर्शन अद्याप झालेलं नाही. हवामान विभाहानं मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी हाय टाईड चा इशारा दिला असून आला असून समुद्र किनारी आणि चौपाट्यांवर नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरात ढगफुटीसदृश्य पाऊस… 

छत्रपती संभाजी नगर इथं कन्नड सोयगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. रस्ते पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.याच दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पुलावरून एक तरुण वाहून जात असताना थरारक घटना समोर आली आहे. ज्यानंतर बचावकार्य करत तातडीनं या मुलाचा जीव वाचवण्यात आला.

कोकणही ओलाचिंब…

कोकणामध्ये पावसाची संततधार गेल्या काही दिवसांपासून सुरूच असून, पुढील 24 ताससुद्धा यास अपवाद ठरणार नाहीत. शेतीला पूरक असा पाऊस पडल्याने कोकणातील बळीराजा सुखावला आणि शेती कामांना वेग आला. जिल्ह्यात 53% हेक्टरवर अजूनही पेरणीची कामं बाकी असल्यानं कोसळणाऱ्या पावसांच्या सरीत बळीराजा सर्जा आणि राजा घेऊन शेतात नांगरणीत दंग असल्यातचं पाहायला मिळत आहे.

इथं मात्र पाऊसच नाही… 

राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप काही भागांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस न बरसल्याने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. पाण्याअभावी हक्काचा चाराही करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे आता मोठा पाऊस कधी पडतो आणि खरिपाच्या पेरण्या कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण बळीराजाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *