‘बिटकॉइन द्या अन्यथा बॉम्ब हल्ला करू’

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये इमेल आणि फोन कॉल्सच्या द्वारे लोकांना बॉम्ब हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या धमक्यांमध्ये कोणत्याही जाती,धर्म, अतिरेकी संघटनांचा उल्लेख नाही. उलट हल्ला थांबवण्यासाठी हजारो बिटकॉइन्सची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत अमेरिकेत अनेक लोकांना संशयास्पद इमेल आले. अनेकांना कॉल्सही आले. या लोकांना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करू अशा धमक्या देण्यात आल्या. आणि हल्ला टाळायचा असेल तर २०,००० बिटकॉइन जमा करा अशी मागणीही करण्यात आली आहे. याविरोधात लोकांनी स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान या धमक्या खऱ्या आहेत की नाही हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयनेही या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. न्यूयॉर्क पोलिसांनीही याप्रकरणी घाबरून न जाण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.

बिटकॉइन हे गेल्या १० वर्षांत जन्माला आलेले नवीन चलन असून हे फक्त इंटरनेटवर लागू होते. पण या चलनाची किंमत डॉलर्सच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *