प्रत्येकी एक रुपयात नऊ जोडप्यांच्या रेशीमगाठी

श्रीयादे माता प्रजापती नवयुवक मित्र मंडळातर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात प्रजापती समाजातील नऊ जोडपी विवाहबद्ध झाले. केवळ एका रुपयात विवाह पार पडला.

जळगाव शहरातील श्रीकृष्ण लॉन येथे श्रीयादे माता प्रजापती नवयुवक मित्र मंडळातर्फे प्रथमच समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात निशा राहोरिया – श्रवणकुमार अडडाणी, प्रिया माचीवाल – रणजीत टांक, निकीता माचीवाल – राम चौहान, जागृती रेडवाल – चेतन गेदर, किरण साडीवाल – विनोद गाडूणिया, भाग्यश्री गेदर – राम राहोरिया, दुर्गा ओस्तवाल – सुखराम खेडोतिया, मोनिका कुसुंबीवाल – शुभम टांक, कोमल गाडूणिया – पंकज दंबिवाल या जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला.

समाजबाधवांकडून नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. सामूहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराथ येथील वधू-वरांचा समावेश होता. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शिवकर्ण प्रजापत, उपाध्यक्ष भरत प्रजापत, खजिनदार प्रवीण प्रजापत, सचिव कैलाश प्रजापत यांच्यासह भवरलाल प्रजापत, प्रमोद प्रजापत, कैलास प्रजापत यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *