राज्यात दिले गेले पहिले मराठा जात प्रमाणपत्र

महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलंय. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.

वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतोय.त्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी या जात प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे.

दरम्यान गावा-गावात जाऊन कागदपत्र गोळा करून मराठा समाजाला जात प्रमाणपत्राचं वाटप करणार असल्याची माहिती अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *