मरीन लाईनच्या बडा कब्रस्तान येथे दफनविधी

मरीन लाईनच्या बडा कब्रस्तान येथे दफनविधी

फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला असून, कुटुंबिय याकूबचा मृतदेह घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. माहिममधील त्याच्या निवासस्थानी याकूबचा मृतदेह नेण्यात येत आहे.

मरीनलाईन्सच्या बडा कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे. दरम्यान, याकूबची अंत्ययात्रा काढण्याबाबतची परवानगीही पोलीसांनी नाकारली आहे.

याकूबच्या माहीम येथील निवासस्थानी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याकूबच्या फाशीनंतर कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी संपूर्ण मुंबईत सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी मुस्लिम समाजातील नेत्यांना याकूबच्या फाशीनंतर कुठलेही वक्तव्य करु नका अशी विनंती केली आहे. याकूबच्या फाशीनंतर प्रक्षोभक वक्तव्य झाले तर, पोलिसांकडून कारवाई होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.

सर्व पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना मुंबईतील संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहे. मेमन कुटुंबिय रहाते त्या माहिमच्या अलहुसैनी इमारतीबाहेर तात्काळ कृती दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या काही समाजकंटकांना आधीच ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *