सध्या गरोदरपणातील मधुमेह ही एक वाढती समस्या बनत आहे. कमीत कमी पाच टक्के गरोदर स्त्रीयांना मधुमेह होतो. काही जणींना गरोदरपणानंतर हा मधुमेह कायम स्वरूप धारण करतो. गरोदर स्त्रीयांना मधुमेहामुळे पायावर सुज येणे, रक्तदाब वाढणे, आकडी येऊन बेशुध्द होणे व बाळाचे वजन जास्त वाढल्यामुळे सीझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते. या समस्यांना सामोरे जावे लागते क्वचित प्रसंगी त्या जीवाला मुकतात. परंतू वेळीच गरोदरपणातील मधुमेहाचे निदान झाल्यास गंभीर प्रसंग टाळता येऊन गरोदर स्त्रीयांचे व बाळाचे आरोग्य सुव्यवस्थित राखता येईल या ध्येयानुसार काम करण्यासाठी ठाण्यातील डॉ. श्रीजित शिंदे, फिजिशियन यांनी Gestational Diabetes Foundation (जेस्टेशनल डायबेटीस फाऊंडेशन ) नावाची संस्था सुरू केली आहे. या संस्थेतर्फे मधुमेही गरोदर स्त्रीयांना मोफत सल्ला दिला जाईल. गरजू व्यक्तीनी 9920256618 / 9326759435 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
गरोदरपणातील मधुमेह – एक समस्या

