नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर बलात्कार

नागपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिला कोइम्बतूर येथून नागपुरात आली होती. ही महिला मुळची त्रिपुराची रहिवासी असून ती कोइम्बतूर येथे नोकरीला होती. घरी जाण्यासाठी ती आपल्या मैत्रिणीसह नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. तिची मैत्रीण इंदूरच्या दिशेनं निघून गेली.

पीडित महिलेला त्रिपुराकडे जाणारी गाडी पकडायची होती. मात्र, तिची गाडी सुटल्यामुळे तिने रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला पोलीस स्टेशनचा पत्ता विचारला. मात्र, या व्यक्तीने तिला पोलीस स्टेशनला नेण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपात नेत तिच्यावर बलात्कार केला. गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकासारख्या ठिकाणाहून महिलेचे अपहरण केले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *