कोरेगाव भिमा गावात अपघात, दोघांचा मृत्यू

पुणे नगर महामार्गवर रात्री 11 वाजता भीषण अपघात झाला आहे. कोरेगाव भिमा गावात झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अहमदनगरहून पुण्याकडे निघालेल्या चार चाकी वाहनानं पायी चालणाऱ्या दोघांना धडक दिली.

चालक जखमी 

धडक दिल्यावर गाडी रस्त्याचे कठडे तोडून उलटली. त्यात स्थानिक राजू जाधव आणि संतोष माने मृत्यू मुखी पडले. चारचाकी गाडी चालवणारा आणि त्याचा सहप्रवासी जखमी झाले असून त्यांना वाघोलीतल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री गाडीच्या धड़केनंतर लांबवर काट्यात फेकल्या गेल्या स्थानिकांना वेळीच उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *