जीवावर उदार होऊन मारतीच्या कठड्यावर उडी मारण्याच स्टंट

तरुण मुलं जीवावर उदार होऊन कसा वेडेपणा करतात त्याचं हे ढळढळीत उदाहरण… एलफिन्स्टन रोड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातल्या तेरा मजल्याच्या इमारतीवर स्टंट करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुंबईत तरुण मुलं एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत असल्याची क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल झाली. काळजाचा ठोका चुकविणारा हा स्टंट पोलिसांपर्यंत पोहचला. हे तरूण परदेशातले असल्याचं समोर आलं आहे.

स्टंट करणाऱ्या सहा तरूणांचा हा ग्रुप आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुळात ही मुलं या उंच इमारतीच्या गच्चीवर पोहोचली कशी आणि त्यांना अशी स्टंटबाजी करताना कुणीच कसं अडवलं नाही, असे सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. गच्चीवर काहीजण हा सर्व प्रकार रेकॉर्ड करताना दिसत आहेत. त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *