हिंगोली जिल्ह्यात २५ वर्षांच्या तरुणीने आई- वडिलांसह पैनगंगा नदीत उडी मारल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत तरुणीचा आणि तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील यातून बचावले आहेत.
हिंगोलीतील पैनगंगा नदीवरील पुलावरुन सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन महिला आणि एका पुरुषाने नदीत उडी मारली. हा प्रकार समजताच स्थानिकांनी तिघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यातील दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पुरुषावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलीस चौकशीत आई- वडील आणि त्यांची २५ वर्षांची मुलगी या तिघांनी नदीत उडी मारल्याचे स्पष्ट झाले. या तिघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत आहेत. या तिघांचीही नावे अद्याप समजू शकलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
