धारदार शस्त्राने वार करुन बॉडी बिल्डरची हत्या

बंगळुरुच्या शिवाजीनगर भागामध्ये सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एका ३० वर्षीय बॉडी बिल्डरची तीन अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. सय्यद इरफान असे मृताचे नाव आहे. सय्यदने व्यायाम शाळेत घाम गाळून उत्तम शरीरयष्टी कमावली होती. तो जीम ट्रेनर म्हणूनही काम करायचा. सय्यदचे माशाचे दुकान होते.

सोमवारी रात्री काम संपवून तो घराच्या दिशेने चालला असताना हेल्मेट घालून आलेल्या तिघांनी त्याला गाठले व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. सय्यद या हल्ल्यात गंभीर झाला. त्याने कुटुंबियांना फोन करुन या हल्ल्याची माहिती दिली.

कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले तेव्हा सय्यद तिथे रक्ताच्या थारोळयात पडलेला होता. त्यांनी त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर सय्यदला मृत घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना पकडण्यासाठी टीम्स बनवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *