सीट डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू, साडेचार लाखाची नुकसान भरपाई

ट्रेनमध्ये प्रवास करत असताना सीट डोक्यावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांना साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुजरात ग्राहक मंचाने दिले आहेत. २००९मध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता.

सविता तरल (३५) ही महिला २००९मध्ये खेडब्रम्हा-तलोद ट्रेनमध्ये आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. या प्रवासा दरम्यान एका ठिकाणी ट्रेनचा ब्रेक लागल्यामुळे वरचा बर्थ आणि त्यावरील सामान सविता तरल यांच्या डोक्यावर आदळले आणि त्या जागीच गतप्राण झाल्या. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांनी ग्राहक मंचाकडे रेल्वेविरोधात साडेसहा लाखाचा दावा ठोकला. स्थानिक ग्राहक मंचाने १.९२ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. इतक्या तुटपुंज्या नुकसान भरपाईविरोधात तरल कुटुंबियांनी राज्य ग्राहक मंचाकडे दाद मागितली. राज्य ग्राहक मंचाने ही रक्कम वाढवून साडेचार लाख केली आहे. ही रक्कम मुलांचं नुकसान, अंतिम संस्कारावरील खर्च, आर्थिक नुकसान अशा सगळ्या खर्चांचा विचार करून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *