आंबेगावात बिबट्याचा पुन्हा हल्ला, दोघे जण जखमी

 पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे बिबट्याने पुन्हा मनुष्यांवरती हल्ला केला आहे. घोडेगाव परांडा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांवर या बिबटयाने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. विजय अनंतराव काळे आणि रामचंद्र मारूती नाईक या दोघांवर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार 

उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.मागील महिन्यात याच परिसरात १२ दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ले केले होते.

नागरिक भयभीत 

रात्री पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने बिबट्याच्या दहशतीने नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत.

वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची माघणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *