दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकण हाऊसफुल्ल झालंय. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने दिवाळी च्या सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचं पहायला मिळतंय.

कोकणचं सौंदर्य प्रत्येकाला खुणावतचं. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत त्यामुळेच यावर्षी दिवाळीच्या सुट्टीसाठी हजारो पर्यटक सद्या कोकणात दाखल झालेत.

सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालं आहे. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झाले आहेत. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किना-यांनाच जास्त पसंती दिली आहे. त्यामुळेच समुद्र किना-यांवर पर्यटकांनी रेलचेल वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *