धक्कादायक प्रकार, हुंड्यासाठी चक्क दोन सूनांची अडीच लाखात विक्री

विरारमध्ये एकाच घरातील दोन सुनाचा हुंड्यासाठी छळ करून, सासू-सासऱ्यांनी अडीच लाखात त्यांची विक्री केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दोन्ही सुना या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत. या बहिणीची विक्री झाल्या नंतर त्याच्यावर अत्याचारही करण्यात आल्याचे समोर आलंय.

महिला दक्षता समितीच्या महिलांच्या पुढाकारामुळे सदर प्रकार उघड झालाय. विरार पश्चिम एम बी इस्टेट, सुमन कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे. या प्रकरणी सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. २००५ पासून  अशा प्रकरचा अत्याचार होत  असल्याच या  महिलांनी तक्रारीत म्हटलंय. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *