पेट्रोल-डिझेल शिवाय चालणारी कार ठाण्यात अवतरली.

ठाण्यात पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालणारी कार अवतरली आहे. भारतातली सगळ्यात पहिली हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली अर्थात इलेक्ट्रिक चार्जिंगची ई-कार ठाण्यातल्या अविनाश निमोणकर यांनी घेतली आहे. ही गाडी शून्य टक्के प्रदूषण करते. फक्त ४९ रुपयांचं चार्जिंग केल्यावर ही गाडी दीडशे किलोमीटर धावते.

ही भारतातली पहिली ई कार. अर्थात इलेक्ट्रिक चार्जिंग कार. अजिबात प्रदूषण न करणारी गाडी. ठाण्यातले व्यावसायिक अविनाश निमोणकर यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही गाडी खरेदी केली आहे.

गाडीची वैशिष्ट्ये

1. या गाडीमुळे शून्य टक्के प्रदूषण होतं.
2. 8 ते 10 तास चार्जिंग केल्यावर गाडी दीडशे किलोमीटर चालते.
3. फक्त 49 रुपयांचं चार्जिंग केल्यावर गाडी दीडशे किलोमीटर धावते
4. या गाडीची देखभाल फारशी करावी लागत नाही
5.या गाडीला ना गिअर, ना इंजिन, ना ऑईलिंग….
6.या गाडीला रोड टॅक्स लागत नाही
7.या गाडीसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी शुल्क लागत नाही
8.महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं या गाडीसाठी जवळपास दोन लाख अडतीस हजाराचं अनुदान मिळतं
9.आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उतरण असताना आणि ब्रेक मारल्यावर ही गाडी चार्ज होते
10.या गाडीची किंमत साडे दहा लाखांच्या आसपास आहे
11.डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन सेंटर्सवर 45 मिनिटांत गाडी चार्ज होते.

या गाडीच्या चार्जिंगसाठी सरकार ठिकठिकाणी चार्जिंग सेंटर उभारते आहे. भविष्यात अशाच हिरव्या नंबर प्लेटच्या गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर धावणं अपेक्षित आहे. चला तुमचा प्रवास सुखाचा होवो आणि पर्यावरणपूरकही होवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *