जपानमध्ये विमान अपघातात तीन जणांचा मृत्यू

जपानमधील टोकियो शहरातील रहिवासी भागामध्ये रविवारी सकाळी एका विमानाला भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत.

पाच आसनी विमानाने टोकियोच्या चोफू विमानतळावर उड्डाण घेतले होते. मात्र विमानतळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर जाऊन ते कोसळले. या विमान अपघातामुळे परिसरातील तीन इमारती आणि तेथे पार्क केलेल्या कारमध्ये आग लागली.

अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे झाला. यामधील दोन विमानातील प्रवासी होते. तर, एक स्थानिक महिला होती. अन्य पाच जखमी लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे टोकियो अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

विमानामध्ये किती प्रवासी होते आणि अपघाताचे नेमके कारण काय आहे, ते समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *