वृद्धाचा ५ वर्षीय मुलीवर बलात्कार

उल्हासनगर  येथील कॅम्प ५ परिसरात एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या ६६ वर्षीय वयोवृद्ध नेपाळी वॉचमनने ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उल्हासनगरात घडली.

हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कमारो (६६)वॉचमन म्हणून काम करत होता. त्याच ठिकाणी त्याचा सहकारीदेखील आपल्या कुटूंबासह राहत असल्याने त्याची ५ वर्षीय लहान मुलगी इमारतीच्या परिसरात खेळत होती. त्यावेळी कमारोने मुलीला इमारतीच्या आडवाटेला नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईने हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कमारोला पोलिसांनी अटक केली. त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *