आजपासून म.रे.वर विशेष ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी कळवा येथे काम हाती घेतले जाणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे आज, गुरुवार २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.

रद्द होणाऱ्या फेऱ्या

स. ५.५७ची डोंबिवली-सीएसएमटी

लोकल २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत.

सायं. ५.१५ची ठाणे ते दादर २७ लोकल सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत.

सायं. ५.५८ची ठाणे ते डोंबिवली लोकल २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत.

रा. ११.१२ची सीएसएमटी ते ठाणे लोकल २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत.

अंशत: रद्द होणाऱ्या फेऱ्या

स. ७.२९ची डोंबिवली लोकल २८ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंत ठाण्याहून स. ७.५२ वाजता सुटेल.

सायं. ५.५३ची सीएसएमटी लोकल २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *