गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
रामटेक येथील अंबाला येथील रहिवासी असलेले संजय गौतम हे आपल्या कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. यात संजय गौतम हे ठार झाले तर त्यांची पत्नी रंजना व मुलगा पिंटू हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा चेंदामेंदा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *