गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न

गणेशोत्सवासाठी मुंबईहून पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे निवडला. पण एक्स्प्रेस वेवर पहाटेपासूनच लांबच लांब रांग लागल्या आहेत. यामुळे गणेशभक्त तासनतास वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष करून बोरगावघाटात अमृतांजन पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. एक्स्प्रेसवेवर ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *