जास्त तेल लावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी ठाण्यात घडली. विजया जितेंद्र भोईर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

विजया बाळकुम पाडा नंबर २ मधील भागीरथ टॉवरमध्ये राहत होती सकाळची शाळा असल्याने बुधवारी सकाळी उठून तिने शाळेची तयारी सुरू केली. मात्र आईने तिच्या डोक्याला जास्त तेल लावले. याच गोष्टीचा तिला राग आला आणि तिने इमारतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *